शाओमीचा ब्लॅक फ्रायडे सेल; एकाच दिवसात विकले गेले 6 लाख मोबाईल
चिनी मोबाईल कंपनी शाओमीने भारतीय बाजारपेठेत चांगलेच बस्तान बसविले आहे. बाजारपेठेवर आणखी पकड मिळविण्यासाठी शाओमीने ग्राहकांसाठी आज ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी लाँच करण्यात आलेल्या ’रेडमी नोट 6 प्रो’वर 1 हजार रुपयाची खास सवलत मिळत आहे. एकाच दिवसात 6 लाख मोबाईल विकण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पहिल्यांदाच क्वाड कॅमेरा ऑॅल राउंडर मोबाईलचा सेल सुरू करण्यात आला. यावेळी 6 लाख मोबाईल एमआय. कॉम व फ्लिपकार्टवरुन विकले गेल्यामुळे स्टॉक संपला आहे. मात्र काळजी करु नका. आम्ही तीन वाजता आणखी सेल सुरू करत आहोत, असे शाओमी इंडियाचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी टिवट केले.
शाओमीने 13 हजार 999 रुपये किंमतीचा (4 जीबी रॅम ) आणि 15 हजार 999 रुपयांचा (6 जीबी रॅम) रेडमी नोट 6 प्रो लाँच केला आहे. सेलमध्ये या दोन्ही मोबाईलवर एक हजार रुपयाची सवलत देण्यात येणार आहे. हा सेल फक्त आजपुरता असल्याचे शाओमीने म्हटले आहे. हा सेल फक्त फ्लिपकार्ट, एमआय होम्स, शाओमीच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
हे आहेत शाओमीच्या नव्या मोबाईलचे फिचर्स-
रेडमी नोट 6 प्रोचा एफएचडी, आयपीएसचा 6.26 इंच स्क्रीन आहे. रॅम 4 जीबी असलेल्या मोबाईलमध्ये 20श्झ्+2श्झ् कॅमेरा आहे. तर 6 जीबी रॅम असलेल्या मोबाईलमध्ये 12श्झ्+5श्झ् कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम्न स्नॅपड्रॅगन 636 ऑॅक्टा-कोअर हे सर्वात आधुनिक प्रोसेजर आहे. तर दोन्ही मॉडेलची बॅटरी ही 4000 स्अप् आहे. तर दोन्ही मोबाईलची मेमरी ही 64 जीबी आहे.
एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, एमएमआयवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना 500 रुपये सवलत मिळणार आहे.

No comments