बंद होणार निम्मे एटीएम मशीन, रोख चलनाचा तुटवडा होण्याची शक्यता
देशात नोटबंदीनंतर आणखी एकदा नागरिकांवर पैशासाठी रांगेत उभारण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण मार्च 2019 पर्यंत काही एटीएम बंद होणार असल्याची माहिती एटीएम इंडस्ट्रीज संघटनेने दिली आहे.
एटीएम उद्योगात होत असलेल्या मोठ्या बदलांबद्दल विचारले असता, अर्थतज्ज्ञ अनुराग सुंदर म्हणाले की, काही एटीएम हे बँकांसाठी फायदेशीर नाहीत. यामागील कारण म्हणजे लोकसंख्येचा बराचसा भाग बँकिंगचे व्यवहार करत नाहीत. भारतीय बँकांनी त्यांच्या सेवेचा संपूर्ण देशात विस्तार करणे आवश्यक आहे. आर्थिक फायदा मिळत नसणे हे एटीएम बंद होण्यामागे मुख्य कारण आहे.
दैनंदिन व्यवहारासाठी लागतात रोख पैसे-
नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल पैसे वापरण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती केली आहे. मात्र डिजिटल पैसे जास्तीत जास्त लोकांकडून वापरण्यास बराचसा काळ लागणार आहे. रोख रकमेचा व्यवहारातील वापर कमी झाला आहे. मात्र, नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी रोख पैसे लागतात. तसेच ज्येष्ठ नागरिक हे तंत्रज्ञानस्नेही नाहीत. त्यामुळे एटीएमचा वापर करता न आल्यासा अनेकांना अडचणीस सामोरे जावे लागेल. बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागतील, तसेच त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल.
काय आहे उपाय-
एटीएम सेवा केंद्र सुरू करणे आणि चालविणे यासाठी आरबीआयचे नियम आहेत. केंद्र सरकारने वित्तीय समावेशन आणि रोख चलनाच्या फायद्याकडे दुर्लक्ष न करता एटीएम सेवांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणखी सुरळीत राहू शकेल, असे सुंदर यांनी मत व्यक्त केले.
आरबीआयने एटीएम ऑपरेटरांना आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यासाठी एटीएम ऑपरेटरांना सुमारे 4 हजार 800 कोटी खर्च करावा लागणार आहे.
काय काम करते एटीएम इंडस्ट्रीज कॉन्फेडरेशन संघटना-
एटीएम इंडस्ट्रीज कॉन्फेडरेशन (ण्अऊश्ग्) ही ना नफा तत्वार चालणारी व्यापारी संघटना आहे. ही संघटना एटीएम उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम करते. तसेच बँकांना सरकारकडून एटीएमचे परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते.

No comments